कर्जत तालुका पदवीधर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आशीष बोरा, सचिवपदी डॉ. अफरोज पठाण
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यात विकासात्मक व सकारात्मक पत्रकारिता करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करताना विविध उपक्रमांद्वरे तालुक्याला व जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, असे मनोगत कर्जत तालुका पदवीधर पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष तथा ब्रेकिंग महाराष्ट्रचे कर्जत-जामखेड विशेष प्रतिनिधी आशीष बोरा यांनी व्यक्त केले.
कर्जत तालुक्यातील विविध वृत्तपत्रे, न्यूज चॅनल व न्यूज पोर्टलच्या माध्यमातून काम करणार्या पत्रकारांची बैठक अध्यक्ष दत्ता उकिरडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली. आगामी काळात तालुक्यात जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, पत्रकारांच्या माध्यमातून विविध योजनाच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करणे, पत्रकारांच्या कुटुंबीयाची संपूर्ण आरोग्य तपासणी करणे, सामाजिक कार्य करणार्या व्यक्तींना विशेष न्याय देणे, त्यांना पुरस्कार देऊन गौरविणे आदी विषयावर चर्चा झाली. यावेळी सर्वानुमते तालुकाध्यक्ष म्हणून आशीष बोरा यांची निवड करण्यात आली.
इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष: महम्मद पठाण व विश्वास रेणुकर, सचिव : डॉ. अफरोज पठाण, कार्याध्यक्ष : आशीष निंभोरे, सहसचिव : दिलिप आनारसे, खजिनदार: सुनिल कांबळे, कायदेशीर सल्लागार : अॅड. विजय सोनवणे, जिल्हा प्रतिनिधी व संपर्क प्रमुख : दत्ता उकीरडे, कार्यकारिणी सदस्य : सचिन गुरव, मुन्ना पठान, संजय यादव, राजेंद्र घोडके, संजय कांबळे, राजाराम माने, सुनिल खामगळ, भाऊसाहेब वाडगे, बाळासाहेब सुपेकर, अशोक सूर्यवंशी, तुषार गायकवाड, संदीप कायगुडे, शाहरुख पठाण, सतिष परदेशी, शिवराज सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
मावळते तालुकाध्यक्ष दत्ता उकिरडे यांनी बोलताना गतवर्षीच्या काळात संघटनेला आलेल्या अडचणी तसेच भविष्यात सामाजिक दृष्टीकोण ठेऊन काय-काय उपक्रम राबवता येईल? याबाबत मार्गदर्शन केले. तर नूतन अध्यक्ष आशीष बोरा म्हणाले, की ‘पत्रकारांनी समाजातील विविध दुर्लक्षित प्रश्नांवर लिखाण केले पाहिजे. समाजाभिमुख पत्रकारिता करत असताना सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. सध्या बदलत चाललेली पत्रकारिता पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीने लोकांसमोर कशी आणता येईल? यासाठीही प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. दिलेली जबाबदारी खंबीरपणे पार पाडण्यासाठी तसेच पत्रकारांच्या उन्नतीसाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करू’ असे त्यांनी सांगितले. यावेळी नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला तर पत्रकार प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल दत्ता उकिरडे यांचा नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीने सत्कार केला. शेवटी अॅड.विजय सोनवणे यांनी सर्वाचे आभार मानले.
————–