चिखली (विशेष प्रतिनिधी) – जानकीदेवी विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून समाजातील समाजातील अनिष्ट रूढी परंपरा व चालीरीतीवर प्रकाश टाकत आज (दि.३०) पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला जोरदार प्रतिसाद मिळाला.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ढोल पथकाच्या माध्यमातून गावामध्ये प्रभात फेरी काढली. त्यानंतर गावातील मंदिर परिसरात ढोल पथकाने विविध प्रात्यक्षिके सादर केली. त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील सरपंच सौ.माधुरीताई वरपे, उपसरपंच प्रवीण बोर्डे, तंटा मुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत पूजन झाले. त्यानंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वराज्य या पथनाटिकेचे सादरीकरण करून समाजातील अनिष्ट गोष्टी त्यामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार, गोरगरिबांची केल्या जाणारी पिळवणूक, शेतकर्यांची पिळवणूक, विद्यार्थ्यांचे हक्क त्या सोबतच काही दिवसांपासून आपल्या महापुरुषांचा सतत अवमान केल्या जात आहे, त्याचा निषेध करून समाज प्रबोधन करण्यात आले. त्यासोबतच संस्कारी मुले आणि असंस्कारी मुले यातील फरक आणि परिणाम मूकनाट्याच्या माध्यमातून सादर केले.
रामकृष्ण विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक आणि डंबेल्स पथकाची सादरीकरण करून उपस्थित नागरिकांची मने जिंकली. याप्रसंगी गावातील सर्व महिला तरुण तरुणी व सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वांनी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे तसेच रामकृष्ण विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले, अशा पद्धतीने जानकीदेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगरूळ नगरीमध्ये आपल्या कृत्याच्या माध्यमातून छाप पाडली. याप्रसंगी ग्रामपंचायत सचिव प्रशांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये गावातील जनतेने विद्यार्थ्यांनी केलेले प्रबोधन आत्मसात करून वैयक्तिक जीवनात अमलात आणावी, असे आवाहन केले, आणि विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उद्धव घुबे सर, तर आभार प्राध्यापक गजानन मिसाळ सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अमोल डुकरे सर, प्रा. संतोष मिसाळ सर, प्रा. दिलीप थुट्टे सर, अमोल घुबे सर प्रा.सौ.पुनम घुबे, प्रा.सौ.रीता पडोळे, सौ.अश्विनी घुबे, तसेच माजी विद्यार्थी विवेक लहाने, कैलास कदम, पवन घुबे यांनी परिश्रम घेतले. सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष शेनफडराव घुबे तसेच प्राचार्य हरिदास घुबे सर यांनी कौतुक केले.