AalandiHead linesPachhim Maharashtra

पुण्यात मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीराचे आयोजन

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या वतीने २९ व्या मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीराचे आयोजन ५ जानेवारी २०२३ रोजी संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आले आहे. अशी माहिती संचेती हॉस्पिटल चेअरमन डॉ. पराग संचेती, भारतीय जैन संघटनेचे संस्थपाक शांतिलाल मुथ्था, चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांनी दिली.

विश्वविख्यात प्लॅस्टिक सर्जन स्वर्गीय डॉ. शरदकुमार दिक्षित (अमेरिका) यांनी भारतात येऊन २,८८००० पेक्षा जास्त मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या होत्या आता मागील ११ वर्षापासून यांच्या स्मरणार्थ देशभरात या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. मानवसेवेचा हा महायज्ञ त्यांचे अमेरिकेतील सुशिष्य प्रसिध्द प्लॅस्टिक सर्जन डॉ. लॅरी वेइंस्टन, डॉ. बॅरी सिट्रॉन, डॉ.लॉरेन्स ब्रेनर, लिंडा पॅटरसन यांनी गेल्या ११ वर्षापासून पुढे चालू ठेवला आहे. येत्या ५ ते ८ जानेवारी २०२३ च्या शिबिरामध्ये अंदाजे २०० ते ३०० रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओंठ, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती, चिकटलेली हाताची बोटे, फुगलेले गाल अश्या प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार असल्याचे शिबीर प्रमुख शशिकांत मुनोत यांनी सांगितले. कोविड प्रोटोकॉल मुळे यावर्षी चेहऱ्यावरील व्रण व डाग यावर शस्त्रक्रिया होणार नाहीत.

या शिबिरात रुग्णांची नोंदणी व तपासणी फक्त गुरुवारी ( दि. ५ ) सकाळी ९.०० ते २.०० या वेळेत होणार आहे. त्या नांतर दिनांक ६ ते ८ जानेवारी या तीन दिवसांचे कार्यकाळात निवडलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार येणार आहेत. अधिक माहितीसाठी विजय पारख ( ९८२२४ २४३१६ ), राजेंद्र सुराणा ( ९३७१०२३१६१ ), विरेश छाजेड ( ८३७९०५५७५९ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!