Head linesPachhim Maharashtra

सोलापूर झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची सातार्‍याला पदोन्नती

– एस. एन. कोहिनकर नवे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची सातारा येथे पदोन्नती झाली आहे. तसा आदेश राज्याचे अवरसचिव यांनी शुक्रवारी काढला आहे. चंचल पाटील यांना सातार्‍याच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी एस. एन. कोहिनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चंचल पाटील

याबरोबरच सोलापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त एम. जी. सांगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंचल पाटील यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी २०१७ साली नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. या दरम्यान त्यांनी एक वर्ष समाज कल्याण अधिकारी म्हणून प्रभारी पदभार सांभाळला आहे. तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची पुण्याला बदली झाल्यानंतर त्यांचाही अतिरिक्त पदभार चंचल पाटील यांच्याकडे आला होता. गेल्या पाच वर्षापासून जिल्हा परिषद मध्ये कार्यरत होत्या.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!