Pachhim MaharashtraSOLAPUR

दक्षिण सोलापूर कर्मचारी युनियन अध्यक्षपदी विक्रम शहा; सचिवपदी अविनाश भरले

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषद कर्मचारी युनियन दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सहाय्यक विक्रम शहा तर सचिवपदी अविनाश भरले, कनिष्ठ सहायक बांधकाम यांची एकमताने निवड करण्यात आली.

ही बैठक जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवली यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, विभागीय संघटक डॉ.एस. पी. माने, कृषी संघटनेचे राज्य सचिव सचिन चव्हाण, राजशेखर कमले, रविशंकर बोधले, जिल्हा सचिव विलास मसलकर, सल्लागार श्रीशैल देशमुख, राजीव गाडेकर, राकेश सोडी, विशाल घोगरे, संतोष शिंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीनंतर नूतन पदाधिकारी यांचा शाल व रोप देऊन कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या पदाधिकार्‍यांची झाली निवड..
जगदिश मेटकरी सहाय्यक लेखा अधिकारी कार्याध्यक्ष, सहसचिव गणेश वाघमोडे, कनिष्ठ सहाय्यक ग्रामीण पाणीपुरवठा तर कोषाध्यक्ष विकास म्हेत्रे कनिष्ठ सहाय्यक आयसीडीएस विभाग यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारणी सदस्य – राजशेखर नागणसुरे विस्तार अधिकारी (शिक्षण), अमर दोडमनी विस्तार अधिकारी, सुरेश गंगदे वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग, सतीश धुमकनाळे पशुधन पर्यवेक्षेक, मंजुनाथ चिचोळी कनिष्ठ सहाय्यक ल.पा.उप विभाग, भीमाशंकर वाले कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती, भारत जाधव आरोग्य सहाय्यक, पंकज वेदपाठक कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती, सुधीर फ़ुलारी कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती, सुनिता लांबतुरे कनिष्ठ सहाय्यक, श्रीमती लीला पुजारी, डॉ. अनुराधा सोनकांबळे, अश्विनी ओहाळ, मनिषा वास्ते, रवी कोरे, संकेत मस्के, श्रीकांत मेगर्ती, कैलास जीदे, रिमा पवार, श्रीदेवी शिंदे आदींची निवड करण्यात आली.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!