लोणार (तालुका प्रतिनिधी) – लोणार तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेल्या चिखला-काकड गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत गणेश भास्करराव काकड हे ३०७ मतांनी विजयी झाले. ग्रामपंचायत चिखला काकड येथे आटेश्वर महाराज ग्रामविकास पॅनलचे नऊ पैकी सात सदस्य निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
चिखला ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून या निवडणुकीचे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले होते. चिखला काकड निवडणूक रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी पार पडली होती, त्यात १४४८ जणांनी मतदान केले होते. मंगळवार दिनांक २० डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत गणेश भास्करराव काकड यांना ८३७ तर किसन साळवे यांना ५३० मते मिळवली. त्यामुळे गणेश काकड यांना ३०७ मतांनी विजयी झाले.
सदस्य पदासाठी वार्ड नंबर १ मधून गुलाब आश्रूबा मानतकर, सौ. अनिता शिवाजी इंगळे, सौ. अनुसया संपत अवचार हे विजयी झाले तर वॉर्ड नंबर २ मधून कैलास विठोबा नागरे, सौ. दुर्गा पुंडलिक सानप, सौ.तारामती शिवानंद मुंडे हे विजय झाले. वार्ड नंबर ३ मधून विष्णू राघोजी उगलमुगले, सौ. संध्या एकनाथ उगलमुगले तर एका उमेदवाराचा अर्ज वय २१ वर्ष नसल्यामुळे अर्ज बाद झाल्यामुळे या ठिकाणची सदस्य पदाची जागा रिक्त राहिली. या निवडणुकीची सर्व धुरा कृषी खरेदी-विक्रीचे माजी संचालक शिवराम काकड यांनी हाती घेतली होती, हे येथे विशेष.