सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – दोड्डी (तालुका दक्षिण सोलापूर) येथे ग्रामपंचायत यांच्याकडून दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के लाभांश निधीचे वाटप सरपंच कलावती मल्लिनाथ गिराम यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन ग्रामपंचायत दोड्डी येथे बुधवारी करण्यात आले होते. यावेळी ग्रामसेवक संजयकुमार राठोड यांनी दिव्यांगांना शासनाच्या कोण-कोणत्या योजना आहेत, याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच या योजनेचा लाभ दिव्यांगणा त्वरित मिळावा यासाठी जे काही कागदपत्रे लागतील त्यासाठी ग्रामपंचायतीकडून त्वरित देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सहा दिव्यांगांना प्रत्येकी दोन हजार रुपयाच्याधनादेशशाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये श्याम जाधव, शरद राठोड, आकाश कांबळे, रामचंद्र येरवडे, प्रकाश माने, सविता केशव राऊत या दिव्यांगांना देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप येरवडे, सविता संतोष कोरे, रतन राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी वैभव कोळी, तानाजी माने आदी उपस्थित होते.