सांगली (संकेतराज बने) – मिरज तालुक्यातील नरवाड गावात निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्या आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. भरारी पथक गावात आले याची माहिती मिळताच गावातील चौकात साड्या आणि पैसे आणून टाकले गेले होते. हे कृत्य कुणी केले, याचा तपास आता पोलिस घेत आहेत.
मिरज तालुक्यातील नरवाड येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्या आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा भरारी पथकाच्या कडून जप्त करण्यात आले आहेत. निवडणूक विभागाच्या भरारी पथक गावात येत असले बाबत माहिती लागताच गावातील मुख्य चौकात दहा साड्या आणि पाचशे रुपयेच्या दोन नोटा चौकात टाकण्यात आलेल्या होत्या. सदर साड्या कोणी वाटण्यासाठी आणल्या होत्या याचा तपास सुरू असून, आचारसंहिता कक्षाने साड्या आणि रोख रक्कम जप्त करून पोलिसांच्या कडे जमा करण्यात आलेले आहे.
पोलिसांनी नरवाड येथे भेट देऊन आचारसंहिता कक्ष फिरते पथकाला माहिती देऊन पंचनामा केला. आचारसंहिता कक्षाच्या पथकाने दहा साड्या आणि त्यामध्ये लपवलेल्या दोन ५०० च्या नोटा जप्त करणेत आलेल्या आहेत. सध्या मिरज तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवारी खुल्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मतदारांना वेगवेगळ्या प्रकारचे अमिष दाखविण्याचा प्रकार सुरू झाला आहे. तसाच प्रकार नरवाड गावात आढळून आला आहे. पोलीस प्रशासन आणि भरारी पथकाकडून सर्वत्र पथके तैनात करण्यात आली आहेत.