आरोग्य विभागातील कंत्राटी ‘डाटा एण्ट्री ऑपरेटर्स’ला एका महिन्याचा पगार मिळाला!
– नियमित विद्यावेतन व आणखी दोन महिन्यांच्या पगाराचा प्रश्न अद्याप बाकी!
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – जिल्ह्याच्या आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर कार्यरत डाटा एण्ट्री ऑपरेटरचे तीन महिन्यांपासून वेतन झालेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने ‘आरोग्य विभागातील कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर आली उपासमारीची वेळ!’ https://breakingmaharashtra.in/helth_department/ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. तसेच, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी याप्रश्नी मध्यस्थी करून पुणे येथील यशस्वी अकॅडमी ऑफ स्किल या संस्थेला वेतन देण्यास भाग पाडले होते. या घडामोडींची दखल घेऊन आजअखेर यशस्वी अॅकॅडमी या संस्थेने या डाटा एण्ट्री ऑपरेटरचा एका महिन्याचा पगार अदा केला आहे. तसेच, उर्वरित वेतनही देण्याचे कळवले आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचार्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ व आ. गायकवाड यांचे आभार व्यक्त केले आहेत. हा प्रश्न आरोग्य सचिवांकडेदेखील ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने मांडलेला आहे.
जिल्हा आरोग्य विभागातील कंत्राटी डाटा ऑपरेटर यांचे तीन महिन्याचे वेतन थांबले होते. परंतु ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ व बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पाठपुरावा करून डाटा ऑपरेटर यांचा एक महिन्याचा पगार मिळवून दिला आहे. त्यामुळे आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणारे डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी आनंद व्यक्त केला. तसेच ‘ब्रेकिंग महाराष्ट्र; व बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे आभार मानले आहेत. यशस्वी कंपनी ऑफ स्कील, पुणे याद्वारे भरण्यात आलेल्या ट्रेनी मुलांचे एका महिन्याचे विद्यावेतन आज वितरित करण्यात आले.
याप्रश्नी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी यशस्वी कंपनी ऑफ स्कील, पुणेचे डेटा एन्ट्री ऑपरेटर्स गेले असता, त्यांनी हेल्थ सेक्रेटरी यांना विचारणा केली, तर ५ ते ६ दिवसात विद्यावेतन होईल, असे सांगितले. आज दि १७/१२/२०२२ रोजी यशस्वी कंपनीने सप्टेंबर ते ऑक्टोम्बर असे एका महिन्याचे विद्या वेतन आज वितरित केले. आमदार संजय गायकवाड यांनी घेतलेल्या दक्षतेमुळे हे शक्य झाले. बुलढाणा जिल्ह्यातील ९६ ट्रेनी डेटा ऑपरेटर यांना विद्यावेतन मिळाले आहे.
—————