AalandiHead linesPachhim Maharashtra

अलंकापुरीत ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमात घाटाची स्वच्छता!

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अजिंक्य डी वाय पाटील टेकनिकल कँपस लोहगाव येथील एन.एस.एस युनिट ए 157, आळंदी जनहित फाऊंडेशन व रानजाई प्रकल्प देहू यांचे माध्यमातून चला जाणुया नदीला तसेच आळंदी नगरपरिषद स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सामाजिक बांधिलकीतून आळंदीत इंद्रायणी नदी घाट, इंद्रायणी तीरावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्थळ स्मारक परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेत परिसर तसेच स्मारक पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छता करण्यात आली.

या अभियान मध्ये कार्यक्रम अधिकारी दिलीप घुले, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी नगरपरिषद आरोग्य निरीक्षक हनुमंत लोखंडे, मुकादम मालनताई पाटोळे, नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर आदी सहभागी झाले होते. माऊली मंदिरात कार्यक्रम अधिकारी दिलीप घुले यांचेसह उपस्थित टीम चा आळंदी देवस्थान तर्फे माऊली पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते श्रीफळ प्रसाद देवून सत्कार करण्यात आला. यावेळी माऊलींचे मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, श्रीकांत लवांडे, नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर उपस्थित होते. माउली मंदिरात भागवत काटकर यांनी पर्यावरण व निसर्ग संवर्धन यावर मार्गदर्शन करीत महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेशी संवाद साधला.

आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, आळंदी जनहित फाऊंडेशन, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, देहू रानजाई प्रकल्प प्रमुख सोमनाथ आबा मसुडगे इतर सेवाभावी संस्था यांचे मार्गदर्शनात चला जाणूया नदीला उपक्रम आळंदी, देहू मध्ये सुरु करण्यात आला आहे. याच उपक्रमाचा भाग आळंदी आणि देहू येथील इंद्रायणी नदी परिसरात स्वच्छता करीत जनजागृती अभियान राबविण्यात आले. आळंदी लोहगाव येथील महाविद्यालयाचे माध्यमातून आळंदी इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता आणि जनजागृती करण्यात आली. अजिंक्य डी. वाय. पाटील टेकनिकल कँपस लोहगाव राष्ट्रीय सेवा योजना युनिट ए १५७ लोहगाव महाविद्यालयाचे संचालक डॉ. कमलजीत कौर, प्राचार्य डॉ फारूक सय्यद यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या उपक्रमात कॉलेज चे युवक, तरुणी तसेच सेवाभावी संस्था पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी दिलीप घुले म्हणाले, प्रत्येकाने आपापल्या भागात तसेच घर आणि परिसरात स्वच्छते विषयी जनजागृती करून स्वच्छ भारत अभियान सर्वांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. पसायदान गायन, माऊली मंदिरात श्रींचे समाधी दर्शन घेवून स्वच्छता अभियानची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!