सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पायाचा उपचार बरा करायचा असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेतला तर पायातील वाकडेपणा दूर होऊ शकतो, असे मत अस्थि विभागप्रमुख डॉ. सुनील हाद्वळमट यांनी केले.
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे अस्थी विभाग यांच्यावतीने क्लब फुटचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. डिस्ट्रिक्ट क्लब यांच्यावतीने क्युआर इंडिया व अस्थी विभाग यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी जुन्या पेशंटनी आपला अनुभव सांगितला. क्लब फूट बाधित बाळ जन्माला आल्यानंतर देखील सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडीमुळे अनेक रुग्ण बरे झाले आहेत. तसेच अनेकांचा पाय देखील सरळ झाला असल्याचा अनुभव सांगितला. यावेळी डॉ. नयन चौधरी, डॉ. सागर जाधव, डॉ. विकास कटारे, रुग्ण व पालक यांची प्रमुख उपस्थिती होती. मेघा प्रदीप गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.