कर्जत (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुत्तो यांनी केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचा कर्जतमध्ये निषेध करण्यात आला. यानिमित्त पाकिस्तानचा राष्ट्रध्वज भाजपने जाळला.
कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुका भाजपाच्या वतीने आ. प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत बिलावल भुत्तो यांच्या प्रतिमेला जोडे मारत व पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयजयकार करत, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, तालुका समन्वयक पप्पूशेठ धोदाड, सुनील काळे, शेखर खरमरे, राहुल निंभोरे, आरती थोरात, अनिल गदादे, बंटी यादव, शोयब काझी, उमेश जपे, काकासाहेब धांडे, बबन लाढाणे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.