SOLAPUR

जल जीवन मिशनच्या कामासाठी ठेकेदारांचा झेडपीत ठिय्या!

साेलापूर (संदीप येरवडे) –  सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जल जीवन मिशनच्या ‘हर घर जल अभियानच्या’ १८९ कोटी रुपयांच्या काढलेल्या निविदा देण्याची काम सुरुवात झाली आहे. परंतु हे काम आपल्यालाच मिळावे, यासाठी जिल्हाभरातून ठेकेदारांनी जिल्हा परिषदेकडे चकरा मारत आहेत.

जल जीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामातून गावातील सामान्य लोकांची तहान भागणार आहे. कारण जल जीवन मिशन टेंडर देण्याची मोहीम सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे मोठ्या प्रमाणात आमदार असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना टेंडर मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांची मात्र गोची निर्माण झाली आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्या कार्यालयाकडे सध्या ठेकेदार चकरा मारत आहेत. काही ठेकेदार ठिय्या मांडून टेंडर आपल्या पदरात पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!