AalandiPachhim Maharashtra

राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा : अ‍ॅड. तापकीर

आळंदी (अर्जुन मेदनकर) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे त्यांची राज्याच्या राज्यपाल पदावरून तात्काळ हकालपट्टी करून राजीनामा घ्यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णू तापकीर यांनी केली आहे.

महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अ‍ॅड. तापकीर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे इमेलद्वारे राज्यपाल कोश्यारी यांचा तात्काळ राजीनामा घेऊन तात्काळ महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णू तापकीर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष पाठीशी घालत असून भाजपाचे नेते मंडळी या बाबत काहीही बोलत नसून गप्प का आहेत, या मागचे गौड बंगाल काय आहे, असा सवाल अ‍ॅड. तापकीर यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!