AalandiPachhim Maharashtra

भाविकांच्या आरोग्य सेवेस आळंदीत प्राधान्य : मुख्याधिकारी अंकुश जाधव

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी कार्तिकी यात्रा काळात भावी,वारकरी, नागरिक यांची गैरसोय होऊ नये यासाठी आळंदी नगरपरिषदेने यात्रा कालावधीत भाविक वारक-यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्यासाठी परिश्रम पूर्वक विशेष दक्षता घेत सेवा सुविधा देत सेवा करण्याची संधी मिळाली. यातून आपणांस समाधान लाभल्याचे आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. आळंदीतील यात्रा काळात जादा मनुष्य बाळाचा वापर करून नागरी सुविधा उपलब्द्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, खेडचेउपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, खेडच्या तहसीलदार तथा आळंदी नगरपरिषद प्रशासक वैशाली वाघमारे यांचे मार्गदर्शक सूचनादेशा प्रमाणे कामकाज करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.

प्रशासकीय कामकाज करताना यासाठी विषेश काळजी घेण्यात आली असून यात्रेकरूंना पिण्याकरिता तसेच इतर गोष्टीना वापरण्यास पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी मिळावे यासाठी प्रभावी नियोजन करण्यात आले. शहरात विविध २३ ठिकाणांवर २४ तास पाण्याचे टँकर उभे करून सोय करण्यात आली. जवळ उपलब्ध असलेल्या पुनर्भरण स्थळावरून टँकरचे पुनर्भरण देखील नियमित करण्यात आले. भाविकांना लघुशंकेकरिता तसेच प्रात:विधिकरिता शहरात २५ ठिकाणावर एकूण ३१० मोबाईल शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये वारकऱ्यांच्या दिंड्या उतरलेल्या ठिकाणांचा व नदीपात्रा मधील ठिकाणांचा विशेषतः समावेश करण्यात आला यातून स्वच्छ तीर्थक्षेत्र आळंदी ठेवण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली. शहरातील कचरा उचलण्याचे संपुर्ण कामकाम रात्रीच्या शिफ्ट मध्ये रात्री अकरा ते पहाटे ६ यावेळेत पूर्ण करण्यात आले. पहाटे सर्व शहरात जंतुनाशक फवारणी तसेच सायंकाळी धुरफवारणी करीत नागरिक, भाविकांच्या आरोग्यासाठी दक्षता घेण्यात आली. भाविक, नागरिकांना मोकाट जनावरांचा त्रास होऊ नये यासाठी पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे भटक्या जनावरांवर कार्यवाही करणारे पथक व वाहन शहरातील मंदिर व आजूबाजूच्या परिसरात तैनात ठेवण्यात आले होते. शहरातील सर्व मोफत सार्वजनिक शौचालयांवर केअर टेकर तैनात ठेवून मोफत शौचालयांची दिवसातून ३ ते ४ वेळा साफसफाई करण्यात आल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.

पाणी पुरवठा प्रभावी

पाणी पुरवठा करण्यासाठी प्रदक्षीणा रस्तावर दहा प्रमुख ठिकाणी शासनाचे पिण्याच्या दहा टॅंकर उभे केले. प्रदक्षिणा रस्ता लगतच्या जलटाक्या खाली ६ ठिकाणी टॅंकर फिलींग पाईट काढले. टॅंकरसाठी २४ तास पाणी कमी अंतरावर उपलब्ध केले. घुडरे आळी, गोपाळपुरा केळगाव रस्ता परीसरात मोठ्या प्रमाणावर धर्मशाळाची संख्या असल्याने चाकण चौक टाकीस स्वतंत्र मोटार देत दररोज दीड तास पाणी देण्यात आले. गावठाणात, मंदीर परीसरात टॅंकर जात नसल्याने दररोज दीड तास पाणी देत सोय करण्यात आली.

अग्निशमन सेवा ; दोन जणांचे जीव वाचविले

पीएममआरडीए, पीसीएमसी आणि आळंदी नगरपालीका असे तीन अग्निशमन वाहन तैनात ठेवण्यात आले. या शिवाय इंद्रायणी नदीपात्रात NDRF , पीसीएमसी व आपत्ती व्यवस्थापन गटाची जीवरक्षक बोट तैनात ठेवली. यामार्फत दोन नागरिकांचा जीव वाचवण्यात प्रशासनास यश आल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!