Jalgaon KhandeshKhandeshPolitical NewsPolitics

एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? गिरीश महाजनांचा खडसेंच्या वर्मी घाव!

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी) – एकनाथ खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? अशा प्रकारचे खळबळजक वक्तव्य करून मंत्री गिरीश महाजन यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वर्मावरच घाव घातला. खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, याचा तपास करण्याची गरज असल्याचे सांगून, महाजन यांनी निखिल खडसेंच्या मृत्यूची चौकशी करा, अशी मागणीच केली. निखिल खडसे यांनी १ मे २०१३ रोजी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवले होते. निखिल हे खासदार रक्षा खडसे यांचे पती, तसेच एकनाथ खडसे यांचे एकुलते एक चिरंजीव होते.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यात सुरु असलेल्या शाब्दिक युद्धाने आता अत्यंत विखारी वळण घेतले आहे. एकनाथ खडसे यांनी अलीकडेच महाजन यांच्यावर टीका करताना त्यांना मुलगा नसल्याचे म्हटले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना त्यांच्याच भाषेत प्रत्यु्त्तर देताना एक खळबळजनक शंका उपस्थित केली. एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली होती की त्याचा खून झाला होता, याचा तपास केला पाहिजे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले. ते सोमवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या अगदी वर्मी बसेल, असा घाव घातला. महाजन म्हणाले, की ‘मुलगा नसणं हे काही दुर्देव नाही. मला मुली आहेत हे माझं सुदैव आहे. पण माझा त्यांना प्रश्नय की त्यांनाही मुलगा होता. त्याचं काय झालं?’, असा सवाल महाजन यांनी खडसेंना केला. ‘मला हा विषय बोलायचा नाही. मात्र ते जर माझ्या मुलांबद्दल बोलत असतील, तर त्यांनाही एक मुलगा होता. त्याचं काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचा विषय आहे. मी जर बोललो तर त्यांना झोंबेल. खडसेंच्या मुलाचा खून झाला की आत्महत्या, हे तपसणं गरजेचं आहे. मला फार बोलायला लावू नका, यातच तुमचं भलं आहे’, असा इशाराही महाजन यांनी यावेळेस दिला.


या प्रकरणावर बोलताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन तणावाखाली आहेत, त्यांना काय बोलावं सुचत नाहीये. असं नीच राजकारण मी कधी आयुष्यात केलं नाही. यांचे अनेक उद्योग मला माहिती आहेत असे खडसे म्हणाले. माझ्या मुलाचा खून झाला की आत्महत्या याबद्दल बोलायचे झाले तर केंद्रामध्ये यांचे सरकार आहे, त्यांना अशी शंका असेल तर चौकशी करायला माझी हरकत नाही. त्यावेळेस मी घरी नव्हतो, त्यासंदर्भात सीबीआय वगैरे आणखी यंत्रणांनी चौकशी करावी, असेही खडसे म्हणाले.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!