आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदीतील जलाराम सत्संग मंडळातर्फे कार्तिकी यात्रा काळात विविध सेवा सुविधा देण्यात आल्याची माहिती मंडळाचे सचिव दामजीभाई राठोड यांनी दिली. यामध्ये भाविकांना चहापाणी, अन्नदान, मंडळाच्या दवाखान्याचे वतीने मोफत वैद्यकीय उपचार आणि परिसरातील गरजूं वारकऱ्यांनी साठी मोफत फिरता दवाखाना (मोबाईल व्हॅन), मोफत औषधे, यात्रा काळात विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी मोफत निवास भोजन व्यवस्था उपलब्द्ध करून देण्यात आली.
मंदिरातील माता संतोषी देवीला अर्पण झालेल्या वैभवी साड्यांचे महिला वारकऱ्यांना मोफत वाटप केले जाते. अशा विविध सेवा सुविधा यावर्षीही उपलब्द्ध करून देण्यात आल्या. समाज उपयोगी पडणारे अनेक उपक्रम जलाराम सत्संग मंडळ आळंदी पंचक्रोशीत राबवित आहे. यासाठी मंडळाचे अध्यक्ष धीरुभाई राजा, सचिव दामजीभाई राठोड, विश्वस्त चमनलालभाई चौथानी ,नरेंद्रभाई चोटाई, राजेशभाई मदलानी,नारायणभाई राठोड, योगेशभाई शहा, नारायणभाई सोळंकी, जसवंतीबेन शहा आदी प्रभावी पाने कार्य करीत असल्याचे मंडळाचे सचिव दामजीभाई राठोड यांनी सांगितले.