धुळे (न्यूज ब्युराे चीफ) – पुणे येथून मध्यप्रदेशकडे जाणारा आयशर वाहन तापी नदीत पडल्याची घटना सकाळी शिरपूर तालुक्यातील सावलदे पुलावर घडली आहे. सदर वाहन पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहेत. वाहनातील सहचालकाचा जीव वाचला असून, चालक ठार झाला आहे.
आज सकाळी पुणे येथून इंदूरकडे कुरकुरे घेऊन जाणाऱ्या CG 07 CG 8970 या क्रमांकाच्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिरपूर तालुक्यातील सावलदे पुलावरील कठडे तोडून वाहन तापी नदीत पडले. परिसरात मोठा आवाज झाल्याने रस्त्यावरील प्रवासी वाहन धारकांसह ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी शिरपूर पोलिसांसह नरडाना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. याठिकाणी आपत्ती निवारण कक्षाचे पथक देखील पाेहाेचले. शोधमोहीम दरम्यान सहचालकास पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून चालक अद्याप बेपत्ता आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र पोलिसांनी तत्काळ रस्त्यावरील गर्दी नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली आहे. दुपारी उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले. ट्रकचा सहचालक सुदैवाने बचावला असून, तो नदीपात्रातून बाहेर निघाला आहे, त्यांचे नाव धर्मेंद्र असल्याचे सांगितले जाते. मात्र चालक ट्रक श पाण्यात बुडवून आहे. त्याचा तपास सुरू असून पोलीस व प्रशासनातर्फे जोरात मदत कार्य सुरू आहे.