AalandiPachhim Maharashtra

आळंदीत संत नगाजी महाराज पुण्यतिथी साजरी

आळंदी ( अर्जुन मेदनकर) : येथील संत नगाजी महाराज ( विदर्भ ) पुण्यतिथी परंपरेने विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांनी हरिनाम गजरात साजरी करण्यात आली.
या निमित्त श्री संत नगाजी महाराज मंदिर गोपाळपूर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात झाला. यात श्री ग्रंथराज ज्ञानेह्स्वरी पारायण सोहळा साजरा झाल्याचे ह. भ. प. लक्ष्मण महाराज दाभेकर यांनी सांगितले. या सोहळ्यात भजन, कीर्तन, हरिपाठ, श्रींची पूजा आदी धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. यावेळी
परिसरातून श्रींचे दर्शनासह मोठ्या प्रमाणात अन्नदान उपक्रमाचा भाविक, भक्तांनी लाभ घेतला. या सप्ताहाचे संयोजन गणेश महाराज दाभेकर यांनी परिश्रम पूर्वक केले. ह. भ. प. लक्ष्मण महाराज दाभेकर यांचे मार्गदर्शन सप्ताहास मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!