Uncategorized

भाजपच्या नगरसेविका अश्विनी दळवी-गायकवाड फोडणार नगर पंचायतीचे फटाके!

कर्जत (आशिष बोरा यांजकडून) : कर्जत नगर पंचायतीमधील कारभाराबाबत गेली अनेक दिवसांपासून मी अभ्यास करत असून, आगामी काळात लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे काम मी विरोधी पक्ष प्रमुख म्हणून करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नगरसेविका अश्विनी दळवी-गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. या दिवाळीत त्या कोणत्या प्रकारचे फटाके फोडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कर्जत नगर पंचायती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने 17 पैकी 15 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले विरोधी भाजपला दोन जागावर समाधान मानावे लागले, यामध्ये कर्जत शहरात आपल्या बिनधास्त स्वभावाने स्पष्टवक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपच्या नगरसेविका अश्विनी दळवी-गायकवाड यांच्या कडून लोकांना खूप अपेक्षा होत्या, नगर पंचायत माई गाजवेल असे बोलले जात होते, मात्र गेली आठ दहा महिन्यात असे काहीही पहावयास मिळाले नाही. त्यामुळे शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले. याबाबत दळवी यांची काल नगर पंचायतमध्ये भेट झाल्यानंतर याबाबत विचारले असता, त्यांनी आपण कोणतीही कोणाशीही तडजोड केलेली नसून योग्य पद्धतीने काम करते आहे, असे म्हणत नगर पंचायतचे मुख्याधिकारी व लेखाधिकारी यांनी रुजू झाल्यापासून किती रजा घेतल्या याची लेखी माहिती मागितली असल्याचे पत्रच दाखवले. आपल्या कडून लोकांच्या खूप अपेक्षा असल्याची आपल्याला जाणीव आहे, मात्र आपल्याला राजकारणाचा कोणताही अनुभव नाही, त्यामुळे नगर पंचायत येथील कामकाज समजून घेण्यात वेळ गेला असून, यामुळे आता पर्यत मी हवे तसे काम करू शकले नसले तरी लवकरच आपल्या शंका कुशंकाना कामातून उत्तर देईल, असा विश्वास व्यक्त केला.

विरोधी पक्षाला बसण्यासाठी नगर पंचायतीने कॅबिन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आपण मीटिंग मध्ये करणार आहोत, व आपली मागणी मान्य न झाल्यास झाडाखाली आपले कार्यालय सुरू करणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली.  भाजपच्या नगरसेविका अश्विनी दळवी-गायकवाड या अद्याप आपली छाप पाडू शकलेल्या नाहीत, त्यामुळे या वक्तव्या वरून त्या दिवाळी अगोदर की दिवाळी नंतर फटाके अथवा अँँटमबॉम्ब फोडतात, की त्याचाच फटाका फुसका निघतो यावर जनतेचे लक्ष राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!