मेहकर (तालुका प्रतिनिधी) – समृद्धी महामार्गाचे काम सदोष झाले असून, उद््घाटनाआधीच हा महामार्ग जीवघेणा ठरू लागला आहे. आज रात्री ८ वाजेच्या सुमारास अवघ्या पाच मिनिटांत दोन दुचाकीस्वारांचे अपघात झाले असून, त्याच चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
मेहकर तालुक्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गाचे सदोष काम झालेले आहे, तसेच ठेकेदाराने अनेक ठिकाणी आडवे दुभाजक धोकादायकरित्या टाकून ठेवलेले आहे. त्याला रिफ्लेक्टर वैगरे लावलेले नाहीत. त्यामुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत. मेहकर तालुक्यातील पारडा गावानजिक पॉईंट क्रमांक ९५ जवळ वाहने जावू नये म्हणून आडवे सिमेंट व मातीचे दुभाजक टाकलेले आहे. हे दुभाजक रात्री दिसत नसल्यामुळे मेहकरकडून जाण्याकडे जाणारी एमएच ४८ झेड ६७६६ या क्रमांकाची दुचाकी या दुभाजकावर धडकली. हा अपघात होत नाही तोच अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने पुन्हा एमएच २८ बीई ९२६२ ही जालन्याकडून मेहकरकडे येणारी दुचाकी त्याच दुभाजकावर जोरात धडकली. हे अपघात इतके भीषण होते, की दुचाकी क्रमांक एमएच २८ बीई ९२६२ च्या समोरच्या चाकाच्या रिंगचे अक्षरशः तुकडे झाले होते व दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन पडले होते. हे वृत्त लिहिपर्यंत एमएच ४८ झेड ६७६६ ही दुचाकी कल्याणा येथील असून, दुसरी एमएच २८ बी ९२६२ ही मांडवा येथील असल्याचे प्रथमदर्शींकडून सांगण्यात आले. दोन्ही गाड्यांवर प्रत्येकी दोन व्यक्ती प्रवास करित होत्या. या जखमी झालेल्या चौघांनाही दवाखान्यात हलविण्यात आले होते.