आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भारतीय संस्कृतीत गोपूजन महत्त्वाचे मानले जाते. गो मातेच्या कृतज्ञते साठी वसुबार निमित्त गोवत्स पूजन केले जाते. यासाठी आळंदी शहर आणि पंचक्रोशीत १४० ,ठिकाणी गोवत्स पूजनाची सोय शुक्रवार ( दि.२१ ) वसूबारस निमित्त करण्यात आली असल्याची माहिती संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश गरूड यांनी दिली.
शहरात ठिकठिकाणी गो पूजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक, महिलांनी तसेच गो पूजकाने या सोयीचा लाभ घेण्याचे आवाहन गरुड यांनी केले आहे. आळंदी परिसरातील सार्वजनिक मठ,मंदिरे,चौक परिसरात सामाजिक कार्यकर्ते आणि गोपालक यांच्या सहकार्याने व्यवस्था करण्यात आली आहे. नागरीकांनी येऊन गोवत्स पूजा करण्याचे आवाहन गणेश गरूड यांनी केले आहे. या प्रथा परंपरांचे जोपासण्याचे कार्यात गोभक्त, गोपालक, गोरक्षक यांनी सहभागी व्हावे असे गणेश गरुड यांनी आवाहन केले आहे.