KOLHAPURPachhim Maharashtra

सुनेला अंघोळीला पाणी मागितलं, तिने गरम पाण्याची बादलीच सासूच्या अंगावर ओतली, उपचारादरम्यान सासूचा मृत्यू!

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सासूने सूनेकडे अंघोळीसाठी गरम पाणी मागितले असता, सुनेने सासूच्या अंगावर बादलीनेच उकळतं पाणी ओतल्यामुळे सासू कांताबाई नारायण मोहिते (वय ६०) रा. लक्ष्मी नारायण कॉलनी उजळाईवाडी (ता. करवीर) मूळ गाव भंबेरी (ता. खटाव) जि. सातारा ह्या भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता त्यांचा दहा दिवसानंतर मृत्यू झाला. अंगावर उकळतं पाणी ओतणारी सून मानसिक रोगी असल्याची माहिती पुढे आली आहे.

सासूच्या मृत्यूस कारणीभूत सून राधिका श्रीरंग मोहिते हिच्यावर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने हे करीत आहेत. दि.२१ सप्टेंबररोजी सकाळी साडेनऊ वाजता सासू कांताबाई नारायण मोहिते यांनी सून राधिका श्रीरंग मोहिते हिच्याकडे अंघोळीकरिता गरम पाणी मागितले असता, राग आलेल्या सून राधिका मोहिते हिने गरम पाण्याची बादली सासू कांताबाई यांच्या अंगावर ओतल्याने त्या भाजून जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा ३० सप्टेंबररोजी त्यांचा मृत्यू झाला. या अकस्मात मृत्यूबद्दल दि. १० ऑक्टोबर रोजी नातू ओंकार श्रीरंग मोहिते याच्यासह नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे दि.१६ ऑक्टोबर रोजी सून राधिका श्रीरंग मोहिते हिच्याविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. तर राधिका मोहिते या सन २०१२ पासून स्किझोप्रâेनिया या आजाराने ग्रस्त असून, त्यांच्यावर सातारा, कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती नातेवाईक यांनी दिली. याबाबत कांताबाईचा नातू ओंकार श्रीरंग मोहिते याच्या तक्रारीनुसार गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि अविनाश माने व पोलीस नाईक सकपाळ हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!