उदगीर (तालुका प्रतिनिधी) – उदगीर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेत गट साधन केंद्र उदगीर येथील विषय साधनव्यक्ति ज्ञानोबा व्यंकटराव मुंढे यांना शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते समग्र शिक्षा जिल्हा परिषद लातूरच्यावतीने प्रशस्तीपत्र व ओळखपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, डाएटचे प्राचार्य राजेंद्र गिरी, शिक्षणाधिकारी (प्रा) वंदना फुटाणे मॅडम, शिक्षणाधिकरी नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी भगवानराव फुलारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता भागीरथी गिरी, डॉ. जगनाथ कापसे सर, डॉ राजेश गोरे सर, डॉ विजयकुमार सायगुंडे सर, डॉ सुरवसे सर, इमाम मिर्झा सर, मुकुंद दहिफळे सर, गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे साहेब, व्ही एस सुर्यवंशी सर, एस पी सिंदाळकर सर,प्र् ाा.श्याम डावळे आदी उपस्थित होते.
———————-