चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक व अंत्री खेडेकर येथे सकाळी एक वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा येथून सकाळी सहा वाजेपासून प्रारंभ झालेल्या स्व. भास्करराव शिंगणे यांच्या स्मृती ज्योतीचे मेरा बुद्रुक आणि अंत्री खेडेकर येथे जंगी स्वागत करण्यात आले. स्व. शिंगणे साहेबांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त ही स्मृतीज्योत काढण्यात आली आहे.
मेरा बुद्रुक येथील ग्रामसेवक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भास्करराव पडघान, केंद्रीय सहकारी बुलढाणा जिल्हा बँकेचे मेरा बुद्रुक शाखेची निरीक्षक बंगाळे, कमलकर पडघान, सहकारी बँकेचे इतर कर्मचारी स्वागतासाठी हजर होते. तसेच स्मृति रथ अंत्रीखेडेकर येथे पोहोचले असता, ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुनील खेडेकर, उपाध्यक्ष तेजराव खेडेकर, भागवत खेडेकर, बबन खेडेकर, सुधाकर मोरे, विवेक काळे, अजय खेडेकर, ज्ञानेश्वर खेडेकर, दीपक खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राम खेडेकर, चिखली तालुका उपाध्यक्ष भिकाजी खेडेकर, सरपंच पती सचिन खेडेकर, योगेश खेडेकर, विठ्ठल खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य मंदाताई खेडेकर, उषा माळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य साधनाताई खेडेकर, भास्कर मोरे, सुरेश खेडेकर, विजय मोरे व गावातील इतर प्रतिष्ठित मंडळीसुद्धा हजर होती. ही स्मृतीज्योत सिंदखेडराजा येथून किनगावराजा, बीबी, दुसर बीड, मलकापूर, शेंदुर्जन, साखरखेर्डा, शिंदे, मेरा बु, अंत्री खेडेकर व पुढे बुलढाणा येथे गेली आहे. स्मृतीज्योतीचे आगमन होत असताना पावसानेदेखील हजेरी लावली होती.