चिखली (विशष प्रतिनिधी) – आमोना येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेला डॉ. पंढरी इंगळे यांनी आपल्या सुविद्य पत्नी सौ अनुश्रीताई इंगळे यांचा वाढदिवस शाळेतील लहान मुलांसोबत त्यांना मिठाई देऊन व शाळेला आवश्यक असलेले साऊंड सिस्टिम भेट देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
डॉ. इंगळे हे नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर असतात त्यातच त्यांनी आपली पत्नी सौ अनुश्रीताई इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य भेट देऊन तसेच मुलांसोबत वेळ घालून संवाद साधला. यापूर्वीही त्यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य देऊन साजरा केलेला होता. शहरामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या गावची नाळ तुटू दिली नाही, खरोखरच ते आजही सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. यावरून सामाजिक बांधिलकी दिसून येते, या कार्यक्रमाच्या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. उषाताई गजाननराव इंगळे तसेच उपाध्यक्ष श्री संतोष नारायण जायभाये, श्री विजय प्रताप सिंग सुरडकर ,श्री प्रल्हाद निकम, मुख्याध्यापक श्री एस एस परिहार सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.