कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सामाजिक कार्य असो किंवा धार्मिक सोहळा, राजकारण बाजूला ठेऊन मास्तर प्रेमीगट व बी. एच. पाटील (दादा) प्रेमीगट हे दोन गट एकत्र येऊन काम करीत असतात. या दोन्ही गटाच्या संकल्पनेतून संकटकाळी अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, रेस्क्यू बोट , शववाहिका हे लोकवर्गणीतून उभे केले आहे. हे या वडणगेचे वैशिष्ट्य आहे.
श्री. शिव-पार्वती नवरात्री उत्सव निमित्त मंदिरात सदाशिव पाटील मास्तर गटाच्या वतीने सालाबाद प्रमाणे या ही वर्षी बाजीराव सदाशिव पाटील, करवीर पंचायत समिती मा. सदस्य इंद्रजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना-मास्तर पार्टीचे उपस्थित नेते, संचालक , ग्रामपंचायत सदस्य- श्री. कृष्णात जौंदाळ , सुभाष पाटील , लालासो पाटील , सयाजी घोरपडे , शहाजी पाटील , सौ.शुभांगी पोवार , सौ. कमल चव्हाण , अमर चौगले , दादासो पाटील , सतिश पाटील , सरदार देवणे , बळीराम चव्हाण , अभिजित पाटील , पंडित चौगुले , बाळासो चौगले , शिवाजी चौगले , यांच्यासह शिवसेना मास्तर पार्टीचे सर्व कार्यकर्ते भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांना फराळाचे व फळांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर बी. एच. पाटील (दादा) प्रेमी या गटाकडून आदरणीय बी. एच. पाटील (दादा) यांचा वाढदिवसानिमित्त सुभाष ग्रुपने एक सोहळा म्हणूनच साजरा केला. सकाळी पार्वती मंदिरात शेकडो भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी सुभाष ग्रुपच्या नुतनीकरण केलेल्या फलकाचे अनावरण दादांच्या हस्ते केले. विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोसायटीचे माजी संचालक दिनकर पाटील , यशवंत नांगरे , माजी सरपंच प्रकाश चौगले , लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले (भैय्या), सोसायटी सभापती निवास चौगले , रवि मोरे , अशोक चौगले , विश्वास तोडकर उपस्थित होते.