धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी) – उमरगा शहरातील बसवेश्वर महिला मंडळाच्यावतीने नवरात्रौत्सव उत्सहात साजरा करण्यात आला. यानिमित्त दांडिया गरबा नृत्य आयोजित करण्यात आले तर महिलांनी पारंपारिक गाण्याच्या ठेक्यावर सुंदर ताल धरत या सोहळ्याचा आनंद लुटला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बसवेश्वर महिला मंडळातर्पेâ नवरात्र महोत्सवानिमित्त महिलांसाठी दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांनी पारंपारिक गाण्याच्या ठेक्यावर सुंदर ताल धरला. बच्चे कंपनीनेही धमाल नृत्य केले. परिसरातील असंख्य महिलांनी उत्साहाने यात सहभाग नोंदवला. या दांडिया उत्सवात बसवेश्वर महिला मंडळाच्या सर्व सदस्य आदींस बच्चे कंपनी अन्विता बागल, तूप्पू चिलगुंडे, रक्षु धड्डे, चिऊ पवार, सुप्रिया सुकणे, अनुष्का झांबरे,खुशी शिंदे आदींचा समावेश होता. रात्री ७ ते १० या कालावधीत विविध पारंपरिक गाण्याच्या ठेक्यावर पारंपरिक पद्धतीने दांडिया उत्सव पाहण्यास महिलांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसवेश्वर महिला मंडळ अध्यक्ष बेबी सरोजा सुकणे, सचिव योगिता साठे, कोषाध्यक्ष ज्योती महावरकर यांनी परिश्रम घेतले.