MaharashtraMarathwada

श्री तुळजाभवानी मातेची उद्या दुपारी १२ वाजता होणार विधीवत घटस्थापना

उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ दि.१७ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. तर उद्या, सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी पहाटे व सकाळी श्रीदेवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य व दुपारी १२.०० वाजता घटस्थापना तर सायंकाळी अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. या महोत्सवात दि.२६ सप्टेंबर ते दि.१० ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक, विधी व सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवगावकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई शक्ती देवता श्री तुळजाभवानी श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी शारदे नवरात्र महोत्सव २०२२ ची दि.१७ सप्टेंबरपासून सायंकाळी श्री देवीजींची मंचकी निद्रेपासून महोत्सवास सुरुवात झाली आहे. सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याहस्ते व सर्व मानकरी, पुजारी व पाळेकरी यांच्या उपस्थितीत विधिवत घटस्थापना करण्यात येणार आहे. तर मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीचीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना मिरविण्यात येणार आहे. तसेच बुधवार दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा नैवेद्य आरती व रात्री छबिना काढण्यात येणार आहे. तर गुरुवार दि.२९ सप्टेंबर रोजी श्रीदेवीची अभिषेक पंचामृत रथ अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती व सायंकाळी अभिषेक आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दि.३० सप्टेंबर रोजी ललित पंचमी दिनी श्री देवीजींची पंचामृत मुरली अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत शेषशाही अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत भवानी तलवार अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर सोमवार दि.३ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी दिनी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा सायंकाळी ११.३० वाजता वैदिक होमास व हवनास आरंभ तर दुपारी ४.४५ मिनिटांनी पूर्ण होतील व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी महानवमी (खंडे नवमी) श्री देवीजींची नित्योपचार महापूजा, दुपारी १२.०० वाजता होमावर अजाबली आपली व घटोत्थापन (घट उठविणे) दिवसभर नैवेद्य, दर्शन व रात्री पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर बुधवार दि.५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) उष:काली श्री देवीजींची शिबिकारोहन, मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा विजयादशमी सार्वत्रिक सिमोल्लंघन तसेच रविवार दि.९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा दिनी पहाटे श्री देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना नित्योपचार पूजा, अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्रीचा छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी मंदिर पौर्णिमा व सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, सोलापूर काठ्यासह आरती व रात्रीचे छविना मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात धार्मिक पूजा, विधी व सेवा आदी कार्यक्रम करण्यात येणार आहेत.


भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय

तुळजाभवानीच्या ऑनलाईन दर्शनासाठी Online Puja – seva visit at WWW.shrituljabhavani.in या संकेतस्थळावरुन दर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!