पैठण (शिवनाथ दौंड) – पैठण तालुक्यातील कडेठाण तांडा येथे किराणा दुकानात गोळ्या बिस्कीट आण्यासाठी आलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीवर सख्ख्या चुलत चुलत्यांनेच अमानुष लैंगिक अत्याचार (बलात्कार) केल्याची अतिशय धक्कादायक व माणुसकीला काळिमा फासणारी घटना, कडेठाण तांडा येथे बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. बळीराम सीताराम चव्हाण (वय २५) रा.कडेठाण तांडा असे या नराधमाचे नाव असून, त्याच्याविरूद्ध पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाण्यांत गुरुवारी (दि.२२) बलत्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या नराधमास ताब्यात घेतले आहे.
पैठण तालुक्यातील कडेठाण तांडा येथे बळीराम सीताराम चव्हाण याची किराणा दुकान असल्यामुळे व पीडित मुलीचे घर शेजारीच असल्याने, ती बुधवारी सायंकाळीच्या वेळी दुकानात गोळ्या बिस्कीट आण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला दुकानात घेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ती चिमुकली घरी रडत रडत गेली. मात्र, मुलगी का रडत आहे असे आईने विचारले त्यावेळी ती घाबरली असल्यामुळे तिला काही सांगता येत नव्हते. त्यावेळी चिमुकलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. ते एकूण आईच्या पायाखालची वाळूच सरकली. या मुलीच्या आईवडिलांनी गुरुवारी (दि.२२) लगेच पाचोड पोलिस ठाणे गाठून पाच वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक सुरेश माळी, बीट जमादार संतोष चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. पाचोड पोलिस ठाण्यांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे या करीत आहेत.
————–