LATUR

एकीकडे मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम दिन, दुसरीकडे अतिक्रमणमुक्तीसाठी पत्रकारांचे आंदोलन!

उदगीर, जि. लातूर (संगम पटवारी) – एकीकडे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत असताना, दुसरीकडे ६४ दिवसांपासून उदगीर येथे मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी पत्रकारांचे धरणे आंदोलन चालूच आहे. ही लोकशाहीसाठी लाजिरवाणी बाब ठरली आहे. प्रशासनाने डोळ्यावर गेंड्याची कातडी ओढल्याने आणि लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्याने ही दुर्देवी परिस्थिती ओढावली गेली आहे.

उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयापर्यंतचा मुख्य रस्ता अतिक्रमण काढल्याशिवाय रस्ताचे काम करण्यात येऊ नये, या मागणीसाठी उदगीर येथील धरणे आंदोलन करते पत्रकार हे गेली ६४ दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलनास बसलेले आहे. खरे पाहता हे धरणे आंदोलन चार दिवसात मिटले असते, परंतु प्रशासनातील अधिकार्‍याच्या अकार्यक्षमतेमुळे, हे आंदोलन चालूच राहीले आहे. याला जबाबदार प्रशासनाचे अधिकारी व राजकीय मंडळी हेच आहेत. आज लातूर जिल्ह्यात पाहिल्यास वरिष्ठ अधिकारपासून ते खालच्या अधिकार्‍यापर्यंत सर्व संबंधित अधिकारी अकार्यक्षम असल्याचे चित्र आहे.

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखला जातो. त्यांच्यावर गेली चार दिवसापासून आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे, ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. आज ना उद्या उदगीर तालुका हा जिल्हा होण्याच्या मार्गावरचे शहर आहे. त्यादृष्टीने अरुंद रस्ते हे रुंद होणे गरजेचे आहे. पण याला खतपाणी घालणारे प्रशासनाचे अधिकारी के जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आज रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत असताना, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्याची पत्रकारावर पाळी आलेली आहे. त्यामुळे या देशात लोकशाही आहे किंवा नाही हे सांगणे अवघड झालेले आहे. खरे पाहता लातूरचे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून, पत्रकारांचे चालू असलेले धरणे आंदोलन अतिक्रमण काढून मिटवणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!