उदगीर (योगेश चिद्रेवार) – सोशल मीडियावर देश व हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह शिवीगाळ केली गेली असून, त्यामुळे संवेदनशील वातावरण तयार झालेले आहे. या प्रकारामुळे सामाजिक सौहदर्य धोक्यात येत असल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत उदगीरचे पोलिस निरीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून, देश, धर्माबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करून दोन भिन्न धर्मात व जातीपातील कटुता निर्माण करण्याचे काम काहीजण सोशल मीडियावर करत आहेत. हिंदुस्थान व हिंदुंना एक ध्वनीचित्रीत शिवीदेखील व्हायरल झालेली आहे. ही शिवी वैयक्तीक जाणवत असली तरी, त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. सदरील संवादाचे निरीक्षण केल्यास असे दिसते की, अशी शिवीगाळ करणार्या व्यक्तीची प्रवृत्ती कशामुळे बळावलेली आहे व त्यांचा कोणत्या संघटनेशी संबंध आहे. या बाबीची शहानिशा करून व अशाप्रकारचे कृत्य समाजामध्ये इतर कोणत्याही व्यक्ती करण्याचे धाडस करणार नाही, अशा स्वरूपाची कडक कार्यवाही करून दोषीस कडक शासन करणे आवश्यक आहे. हा विषय अतिशय संवेदनशील असून, यापूर्वीचा इतिहास आपल्याला ज्ञात असल्याने पुनश्च उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. सदरील दोषीवर कठोर कार्यवाही न केल्यास संघटनेच्यावतीने अंदोलन, उपोषण, धरणे करण्याची वेळ प्रशासनाने आणू नये, म्हणून आम्ही सनदशीरमार्गाने निवेदनवजा अर्ज आपल्याकडे सादर करत आहोत, असेही या निवेदनात नमूद आहे.