Head linesLATURMarathwada

हॉस्पिटलने संलग्नित मेडिकल दुकानातून औषधीची सक्ती केल्यास कारवाई!

लातूर/पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यभरातील विविध हॉस्पिटल्स हे त्यांच्याकडे दाखल रुग्णांना त्यांच्या हॉस्पिटलमधील किंवा संलग्न मेडिकल दुकानांतूनच औषधी घेण्यासाठी सक्ती करतात. तसेच, बाहेरून औषधी आणल्यास परत करणे, किंवा काही तरी कारण काढून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास देतात. त्यामुळे, यापुढे हॉस्पिटल्सना त्यांच्या संलग्नित मेडिकल दुकानातूनच औषधी घेण्यासाठी सक्ती करता येणार नाही, असे आदेश प्रशासनाने काढले असून, याबाबतची राज्यभर मागणी करणार्‍या रुग्णहक्क संरक्षण समितीच्या मागणीला मोठे यश आले आहे.

सविस्तर असे, की संपूर्ण महाराष्ट्रात रुग्ण हक्काच्या संरक्षणार्थ कार्यरत असणारी एकमेव रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र टिमचे समिती प्रमुख अ‍ॅड.निलेश करमुडी व प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना हॉस्पिटल संलग्नित मेडिकल दुकानातून औषधी घेण्याची सक्ती करणार्‍या हॉस्पिटलवर कारवाई करा, या मागणीचे निवेदन राज्यभरात देण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये संलग्नित असलेल्या त्याच मेडिकल दुकानातून औषधी घेण्याची सक्ती रुग्ण नातेवाईकावर केली जात असे. बाहेर दुकानातून औषधी अल्पदरात व सवलतीच्या दरात भेटतात, पण आमच्याच मेडिकल दूकानातून औषधी घेण्याची सक्ती अनेक ठिकाणी केली जाते. यामूळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची आर्थिक लूट व पिळवणूक होत होती. ही लूट व मनमानी थांबवावी, याकरिता रुग्णहक्क संरक्षण समितीने संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण जागृती करत निवेदने दिली. याची दखल प्रशासनाने घेत हॉस्पिटलमध्ये संलग्नित असलेल्या मेडिकल दुकानातून औषधी घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये, अन्यथा कारवाई करू, असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दि.०९ डिसेंबर २०२२ रोजी काढून रुग्णांना दिलासा दिला आहे.

याबद्दल रुग्ण हक्क संरक्षण समितीचे समिती प्रमुख अ‍ॅड.निलेश करमुडी, प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, महिला प्रदेशअध्यक्षा रेणुकाताई बोरा, प्रदेश संपर्कप्रमुख विनोद इघवे, प्रदेशसंघटक नरेंद्र बोरा, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख धनाजी जोशी, उत्तर महाराष्ट्र प्रमुख अशोक पालक, विदर्भ विभागप्रमुख रविंद्र मेश्राम, मराठवाडा महिला अध्यक्षा पुजाताई निचळे, मराठवाडा अध्यक्ष प्रा.शिवाजीराव नवरखेले, मराठवाडा कार्याध्यक्ष रामेश्वर गंगावणे, मराठवाडा संपर्कप्रमुख प्रा.शंकरराव सोनवणे, मराठवाडा संघटक रवि बिजलवाड, लातुर जिल्हाध्यक्ष दीपक, लातूर महिला जिल्हाध्यक्षा कावेरी विभुते, पुणे जिल्हाध्यक्ष अमोल शिंगनाथ, सोलापूर जिल्हाध्यक्ष सुमित भांडेकर, सोलापूर शहरअध्यक्ष अकबर शेख, अकोला महिला जिल्हाध्यक्ष संगिता भंडारे, गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रविण बिसेण, परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, परभणी महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई सरोदे, परभणी जिल्हाउपाध्यक्ष रमेश घनघाव, ठाणे जिल्हाध्यक्ष तात्याराव सोनवणे, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ गवळी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष देवेंन्द्र जैस्वाल, बुलढाणा महिला जिल्हाध्यक्ष अर्चना बावसकर, नाशिक जिल्हाध्यक्ष जयाजी यादमाळ, नाशिक महिला जिल्हाध्यक्षा पद्मिनीताई शिंदे आदि सर्व जिल्हाध्यक्ष महिला पदाधिकारी तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!