नंदूरबार (आफताब खान) – नंदूरबार जिल्ह्यात अनेक भागात पाऊस धो-धो बरसत असतांना नंदुरबार तालुक्यातील पुर्व पट्यात मात्र पावसाने दांडी मारली आहे. या भागातील रजाळे, बलवंड, सैताने, खर्दे, तलावडे या गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ चांगल्या पाऊसची अद्यापही प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळेच पाऊस पडण्यासाठी बलवंड गावच्या ग्रामस्थांनी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. अशी यात्रा काढल्यानंतर दोनच दिवसात पाऊस येतो अशी ग्रामस्थांची धारणा असल्याने या प्रतिकात्मक यांत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्या वेगळ्या प्रथेची चर्चा होत असली तरी या भागात पाऊस वरसेल हिच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
पावसासाठी ग्रामस्थांनी काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा
You Might Also Like
- Advertisement -
Latest News
- Advertisement -