PAITHAN

मराठा समाजावर घृणास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलिस निरिक्षकांस बडतर्फ करण्याची मागणी

पाचोड (विजय चिडे) – जळगावचे स्थानिक गुन्हा शाखेच्या एका पोलिस निरिक्षकांनी गणेश उत्सवातच्या काळात त्यांच्या एका सहकार्यसोबत दुरव्धनीवर मराठा समाजाविषयी अंत्यत घृणास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची आँडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखविले असल्याने त्या अधिकाऱ्यांस बडतर्फ करण्यात यावे, यासाठी मराठा बांधवाकडून पैठणचे उपविभागीय अधिकारी डाँ.विशाल नेहूल यांच्याकडे शुक्रवारी (दि.१६)रोजी निवेदन देण्यात आले.

या निवेदनात असे म्हटले की, गणेश उत्सवात काळामध्ये जळगावचे स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी किरणकुमार भगवानराव बकाले पोलीस निरीक्षक जळगाव रा. अधिकारी निवास पो.मु. जळगाव हे एक शासकीय अधिकारी असून त्यांच्या कडे समाजात कायदा सुव्यवस्था व शांतता नांदावी व समाज सुधारण्यासाठी त्यांच्या हाती शासनाने अधिकार दिलेले आहे. परंतु, जर या अधिकाऱ्यांच्या डोक्यात असे जातीभेद व जाती बद्दल अशें संकुचित विचार असेल तर अशा प्रकारचे अधिकारी समाजासाठी घातक असून, अशा अधिकाऱ्यांच्या हाती कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारी देणे हे सर्व समाज व मानवजातीसाठी धोकादायक असून, अशा अधिकाऱ्यास निलंबित करुने उचित नसून या अशा दुष्ट प्रवृत्तींना कायमचे सेवेतून मुक्त करून समाजात भेद निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कारण त्यांनी आपल्या सहकारी अंमलदाराशी फोनवर बोलतांना मराठा समाजाबद्दल अतिशय घृणास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केले असून त्यांनी मराठा समाजामध्ये द्वेषाच्या व दुष्टत्वाच्या भावना वाढविण्याचा प्रयत्न करुन सार्वजनिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला. अशा दुष्ट प्रवृत्तीच्या व समाज विघातक असणाऱ्या व्यक्तींस समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर व मराठा समाजावर जात धर्मांच्या अश्लिल शब्दांचा उच्चार करुन त्यांना लज्जा बोले आहेत. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस निरिक्षक किरणकुमार भगवानराव बकाले यांना निलंबित करण्याऐवजी बडतर्फ करण्यात यावे, यासाठी पैठण विभागीय अधिकारी डाँ.विशाल नेहूल,सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्याकडे पाचोड पोलिस ठाण्यातं निवेदन देण्यात आले असुन या निवेदनावर धनराज भुमरे,प्रभाकर भुमरे,शिवाजी पाचोडे,दत्ता भुमरे,युवराज चावरे,अंगद लेंभे,विजय चिडे,अभिषेक भुमरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!