Chikhali

जलदानविधीचा खर्च ग्रंथालयास अर्पण

– सम्राट अशोक-फुले-आंबेडकर उत्सव समितीचा पुढाकार

चिखली (एकनाथ माळेकर) – येथील सेवानिवृत्त एसटी चालक रमेश नामदेव अवचार यांचे वयाच्या ७५ व्यावर्षी निधन झाले होते. रितीरिवाजानुसार तिसर्‍या दिवशी म्हणजे, १५ सप्टेंबररोजी त्यांचा जलदानविधीचा कार्यक्रम होता. तेव्हा अवचार परिवाराकडून त्यांचे सर्व कुटुंबीय, जावई नंदकिशोर भटकर, चंद्रशेखर भटकर, वानखेडे सर व प्रा. विजय वाकोडे यांनी सम्राट अशोक-फुले-आंबेडकर उत्सव समितीने मांडलेल्या आदर्श संकल्पनेचा विचार करून, जलदानविधीसाठी भोजनावर होणारा खर्च न करता, चिखली येथील नागसेन बुद्धविहार या ठिकाणी सुरू असलेल्या भव्य ग्रंथालयास हा निधी देण्याचे निश्चित केले व त्यानुसार हा निधी देत, आदर्श प्रस्तुत केला. या ग्रंथालयात बहुजन समाजातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा रात्रंदिवस अभ्यास करतात, त्या विद्यार्थ्यांना या निधीतून पुस्तके उपलब्ध होणार आहेत.

जलदान विधी न करता दिलेला निधी हा नागसेन बुद्धविहाराचे उपाध्यक्ष बी. बी. साळवे, आर.एस.जाधव, विणकर सर व प्रा. डॉ.सुभाष राऊत यांनी स्वीकारला. सम्राट अशोक-फुले-आंबेडकर उत्सव समितीच्यावतीने पत्रक काढून सामाजिकदृष्ट्या काही कालबाह्य झालेल्या बाबींना फाटा देऊन आदर्श समाज घडविण्यासाठी आवश्यक बाबींचा समावेश करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून अनेक ठिकाणी या संकल्पनेचा अंगीकार करण्यात येत आहे.

अवचार परिवाराकडून मोजकेच नातेवाईक जाऊन स्मशानभूमीतून रक्षा जमा करून आणली व त्यांच्या राहत्या घरी आदरांजली कार्यक्रम पार पडला. त्यातही मोजक्या आणि जवळचा संबंध असणार्‍या केवळ दोनच नातेवाईकांनी कालकथित रमेश अवचार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आणि, त्यांची रक्षा ही विहीर किंवा नदीत विसर्जित न करता, शेतात पुरून त्यावर पवित्र वृक्षाची लागवड केली जाणार आहे. हा आदर्श सर्व समाजबांधवांनी घ्यावा, असे आवाहन समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ.सुभाष राऊत यांनी आवाहन केले. यावेळी प्रा.डॉ. राजू गवई, संबोधी संस्थेचे एस. एस. गवई, विणकर सर, विलास वानखडे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!