भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या चिखलीत
- पक्ष कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन
चिखली (महेंद्र हिवाळे) – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या दि. १४ सप्टेंबर रोजी चिखली शहरास भेट देत असून, यानिमित्त चिखली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या नवे – जुने सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बावनकुळे हे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या या संवाद मेळाव्यात आ. श्वेताताई महाले यांच्यासह इतर पक्ष पदाधिकारी यांचीदेखील मुख्य उपस्थिती लाभणार आहे. हॉटेल मीरा सेलिब्रेशन येथे सकाळी ९ : ३० वाजता सुरू होणाऱ्या या मेळाव्यास चिखली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आघाड्यांचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन चिखली शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, चिखली तालुकाध्यक्ष सुनील पोफळे व बुलढाणा तालुकाध्यक्ष एड. मोहन पवार यांनी केले आहे.