BULDHANAChikhali

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीची बुलढाणा जिल्हा बैठक उत्साहात

चिखली (तालुका प्रतिनिधी) – ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सभासदांसाठी महत्वाच्या विषयावर मेहकर येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभागाचे अध्यक्ष राजेंद्र लहाने हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजीव जाधव हे होते.

बैठकीत सर्वप्रथम अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आली. शासकीय कार्यालयांना भेटी देण्याचे नियोजन करणे, महावितरण कंपनीच्या कार्यालयांना निवेदन देणे, याबरोबरच अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. राजीव जाधव बुलढाणा जिल्हाध्यक्ष, शिवाजी मोरे बुलढाणा जिल्हा सचिव, सुनिल डोंगरदिवे जिल्हा उपाध्यक्ष, सचिन खंडारे जिल्हा उपाध्यक्ष, विष्णु नवघरे जिल्हा सदस्य, समाधान सरकटे जिल्हा कार्याध्यक्ष, सुनिल अंभोरे जिल्हा कार्याध्यक्ष, नीलेश कोल्हे जिल्हा सहसचिव, राधेश्याम काळे जिल्हा संपर्कप्रमुख, शुभम खरे जिल्हा कार्याध्यक्ष आदी पदाधिकार्‍यांना राजेंद्र लहाने यांच्याहस्ते ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
———————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!