Pachhim Maharashtra

सोलापूर पाटबंधारे विभागात इंजिनिअर्स डे उत्साहात

सोलापूर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – भारतरत्न सर डॉ. एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आज (दि.१५) इंजिनिअर्स डे साजरा केला जातो. सोलापूर पाटबंधारे विभागातही आज सर विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, व त्यांच्या कार्याला उजाळा देत इंजिनिअर्स डे साजरा करण्यात आला.

याप्रसंगी आज सोलापूर पाटबंधारे विभागाचे प्रशासक व अधीक्षक अभियंता श्री साळे यांच्याहस्ते भारतरत्न सर डॉ. एम. विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले. यावेळी पाटबंधारे विभागातील महिला व पुरुष इंजिनियर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाभरातही विविध अभियंत्यांनी आज इंजिनिअर्स डे साजरा करत, एकमेकांना शुभेच्छा दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!