चिखली (महेंद्र हिवाळे) – अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता होते. या दिवशी दहा दिवस पुजल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन भाविक करत असतात. शहरातील नागरिकांना गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सुविधा व्हावी आणि जलप्रदूषणाला आळा बसावा, या उद्देशाने नगर पालिकेतर्फे निर्माल्य कलश म्हणजे कॄत्रिम तलाव तयार करण्यात आले असून, चिखलीकरांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर पालिका प्रशासनाने केले आहे.
शहरातील जुने गाव परिसरातील संत सावता माळी भवन, राजे संभाजीनगर, न. प. माध्यमिक विद्यालय, स्वामी समर्थ मंदिराजवळ, गुप्ता मळा श्री विकास सावजी यांच्या घराजवळ, शाहू नगर श्री गव्हाणे यांच्या घराजवळ, पानगोळे हॉस्पिटलमागे आणि शासकीय दूध डेअरी समोर ही कॄत्रिम तलावांची सुविधा दिवसभर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन नगर पालिका प्रशासनाने केले आहे.