Uncategorized

खिल्लारी बैल जुंपलेल्या बैलगाडीतून निघाली बाप्पांची विसर्जन मिरवणूक!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रताप मोरे) – आपल्या गावाची सुरक्षा व शांतता आपल्या हाती हा उपक्रम राबवित, गणेश मंडळांनी नियमाचे तंतोतंत पालन करीत, अंढेरा पोलिस ठाणेहद्दीतील २२ गावांत गणेश मंडळांनी खिल्लारी बैलजोडीची आकर्षक सजावट करुन बैलगाडीमध्ये गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली. विसर्जन मिरवणुकीचा हा सोहळा शांततेत व आनंदात पार पाडला.

बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेराचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन ८ सप्टेंबर रोजी धोत्रा नंदई फाट्यावरील भगवान मुंडे यांच्या मंगल कार्यालयाच्या सभागृहात करत, गणेशोत्सवाचे नियोजन केले होते. चिखलीचे तहसीलदार डॉ. अजित कुमार येळे यांनी गणेश मंडळांना मार्गदर्शन करताना, गणरायांचे विसर्जन करतेवेळी प्रत्येकांनी न्यायालय, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी , यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, मिरवणुकीत डीजे न लावता स्पीकरमध्ये समाजाच्या भावना दुखावतील अशी गाणे वाजवू नये, गुलाल उधळन्या ऐवजी फुलांचा वर्षांव करावा, दारूच्या नशेत मिरवणूकीत जावू नये, महिला, तरुण मुलींचा आदर करावा, यासाठी पोलिस कर्मचारी मिरवणुकीला उपस्थित असलेतरी गणेश मंडळांच्या स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीला संरक्षण द्यावे, जर एखाद्या व्यक्तीने वाहनांच्या समोर उभे राहून गुलालाची उधळण करून हुल्लडबाजी केली तर त्या मंडळांची नोंद घेतली जाईल, संबंधित मंडळांच्या पदाधिकार्‍यांना बोलवून त्यांना योग्य समज दिली जाईल, गरज भासली तर गुन्हेही दाखल करण्यात येतील, आणि भविष्यात गोंधळ घालणार्‍यांना परवानगी देताना पोलिस प्रशासनातर्पेâ विचार करू, अशा प्रकारची तंबी तहसीलदारांनी दिली होती. त्यानुसार, ठाणेदार व तहसीलदार यांच्या सूचनांचे पालन करत, आपल्या गावाची सुरक्षा आपल्याच हाती असा अभिनव उपक्रम राबवून अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत काही गावात गणेश मंडळांनी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक आकर्षित सजावट केलेल्या खिल्लारी बैलजोडीच्या सजलेल्या बैलगाडीमधून काढून शांततेत गणरायांचे विसर्जन केले.

यावेळी ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे, एसआय मोरर्शिंग राठोड, अच्युतराव शिरसाट, गजानन वाघ, पोहेकॉ कैलास उगले, काकड, दराडे, सोनकांबळे, समाधान झिने, भरत पोफळे, गवई, वाघमारे , खार्डे , जाधव, तथा हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार , आदीनी गावा गावात जाऊन सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!