नंदूरबार (आफताब खान) – शत्तकोतर वर्षांची परंपरा असलेल्या नंदुरबार मधल्या ऐतिहासीक दादा – बाबा गणपतीच्या रथोत्सवाची हरिहर भेट मोठ्या उत्साहात संप्पन झाली आहे. रात्री बारा वाजेच्या सुमारास मानाचा प्रथम गणपती असलेला दादा गणपती जळका बाजार परिसरात आल्यानंतर दुसर्या मानाचा गणपती असलेल्या बाबा गणपतीचा रथदेखील या ठिकाणी आला. परंपरे प्रमाणे दोन्ही मंडळाच्या पदाधिकार्यांनी एक दुसर्या गणरायाची आरती केली.
या आरतीनंतर मंत्रपुष्पांजली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणेमध्ये गुलाल आणि फुलांची उधळणकरत हरिहर भेटीचा नयनरम्य सोहळा संप्पन झाला. याहरिहर भेटीला शतकोत्तर वर्षांची परंपरा असून, हा सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी नंदूरबार जिल्हाभरातूनच नव्हे तर शेजारच्या गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांतूनदेखील गणेशभक्तांनी याठिकाणी गर्दी केली होती.यंदा गणेश रथांवर कोल्ड फायरचे विशेष आकर्षण देखील दिसून आले.
——————