– आई-वडिलांनी अभ्यास करण्यास सांगितले अन तिने रागाच्या भरात घर सोडले!
औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – सोशल मीडियावर फेमस असलेली युट्यूब गर्ल ‘बिंदास काव्या’ अर्थात काव्या यादव ही अचानक बेपत्ता झाली हाेती. काल दुपारपासून ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. कालपासून पाेलिसांसह तिच्या कुटुंबीयांनी जाेरदार शाेधमाेहीम राबविल्याने अखेर ती आज इटारसीत सापडली आहे. ही मुलगी कुठेही दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन आई वडिलांनी केले हाेते. काव्या यादव ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी ३६३ नुसार गुन्हा दाखल केला हाेता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, काव्या ही रेल्वेने बाहेरगावी गेली असल्याचा संशय हाेता. त्यानुसार, ती इटारसीत सापडली. औरंगाबाद पोलिसांनी तिला लखनऊला जाणाऱ्या ट्रेनमधून ताब्यात घेतल्याची माहिती तिच्या पालकांनी दिली आहे.
बेपत्ता झालेल्या काव्याचा शोध लागल्यानंतर तिच्या आई- वडिलांनी युट्यूबवर लाइव्ह येत याची माहिती दिली. अभ्यास करण्यासाठी आई- वडील ओरडल्याने काव्या घर सोडून निघून गेले होते. ट्रेनने ती लखनऊ या त्यांच्या मूळ गावी जात होती. काव्या बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच सोशल मीडियावरूनही मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर पोलीसांनी शोध सुरू केला आणि काव्या त्यांना इटारसी येथे ट्रेनमध्ये सापडली. कमी वयात काव्याने यूट्यूबवर यशस्वी भरारी घेतली असून, काव्या यादवच्या यूट्यूब चॅनेलचे नाव बिंदास काव्या असे आहे. यूट्यूबर तिचे ४.३३ मिलियन सबस्क्राईबर्स आहेत. काव्या ट्रॅव्हल आणि गेमिंग या विषयावर व्हिडिओ बनवते. काव्या यूट्यूबसह इन्स्टाग्रामवरही प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे एक मिलियन फॉलोअर्स आहेत. प्रसिद्ध यूट्यूबर, त्यात अल्पवयीन असल्याने काव्या बेपत्ता होणे हे गंभीर प्रकरण बनले असून, पोलिस तिचा शोध घेत आहे.
प्रसिद्ध सोशल मीडिया इनफ्लूयन्सर म्हणून ओळखली जाणारी बिंदास काव्या ९ सप्टेंबरला घरातून दुपारी २ च्या सुमारास रागाच्या भरात निघून गेली होती. त्यानंतर ती परतली नाही. सायंकाळ होऊनही ती परत न आल्याने कुटुंब मात्र घाबरून गेले. काव्याने मोबाइल देखील बंद केला हाेता. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी छावणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. काव्या अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव कुुटुंब औरंगाबादेतील पडेगाव येथे राहते. २४ तास उलटून गेल्यानंतर तिचा शोध न लागल्याने आई वडील चिंतेत हाेते. आम्हाला कोणीच मदत करत नाहीए. आमची मुलगी कुठे दिसली तर कृपया संपर्क साधा. आमच्या मुलीला कोणी ओळखणार नाही, असे होऊ शकत नाही. आम्हाला वेळीच मदत करा. अन्यथा खूप उशिरा होईल, असे आवाहन तिच्या आई वडिलांनी केले हाेते.
शेवटची ती निळी जीन्स, पांढरे बूट व तोंडाला स्कार्फ परिधान करून बाहेर पडली होती. एका सीसीटीव्ही कॅमेर्यात ती कैद झाली. आई वडिलांनी विविध सोशल मीडियावरून ती बेपता झाल्याचे सांगून, तिला परत येण्याचे आवाहन केले हाेते. तर कोणाला काही माहिती असल्यास त्यांना माहिती देण्याचे आवाहन केले हाेते. काव्या यादव ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी 363 नुसार गुन्हा दाखल केला होता. काव्या ही रेल्वेने बाहेरगावी गेली असल्याचा संशय पोलिसांना होता. हा संशय खरा ठरला आहे. काव्या ही रागाच्या भरात काल, शुक्रवारी भर दुपारी घरातून निघून गेली होती. यानंतर तिच्या आई-वडिलांनी औरंगाबाद येथील छावणी पोलिसांत तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांची तपासाची चक्र फिरवत काव्याचा शोध सुरू केला होता. अखेर काव्या ही मध्य प्रदेशातील इटारसी ते भोपाळ रेल्वे स्थानकादरम्यान मिळाली असल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली आहे. यावेळी ती रेल्वेने प्रवास करत होती. रेल्वे पोलिसांनी तिला खाली उतरवून घेतले आणि आता तिला औरंगाबादला आणण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घर सोडण्याआधी काव्याचे तिच्या आई-वडिलांसोबत वाद झाले होते. १६ वर्षीय काव्याला तिचे आई-वडील अभ्यासाच्या कारणावरुन ओरडले होते. त्यांनी काव्याचा मोबाईलही काढून घेतला होता. यामुळे काव्याला राग अनावर होऊन तिने थेट घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ती शुक्रवारी, दुपारच्या सुमारास घरातून रागारागाने निघून गेली. बिंदास काव्याचं खरं नाव काव्या यादव असं आहे. तिच्या सोशल हॅण्डल्सवरती बिंदास काव्या नाव आहे. त्यामुळे ती या नावानेच प्रसिद्ध आहे. बिंदास काव्या औरंगाबादमधील पडेगाव भागात राहते.
रागाच्या भरात घर सोडून गेलेली काव्यानं मोबाईल घरामध्येच ठेवला होता. त्यामुळे तिचे लोकेशन शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यावेळी काव्याच्या पालकांनी दिलेली माहितीच्या आधारवर पोलिसांचे सायबर सेल कामाला लागले. त्यांनी केलेल्या तपासात काव्या मध्य प्रदेशला जात असल्याचं लक्षात आले. काव्या रेल्वेने मध्य प्रदेशात जात आहे, असा पोलिसांचा अंदाज होता. महाराष्ट्रातून रोज शेकडो रेल्वे मध्य प्रदेशात जातात. त्यामुळे नेमक्या कोणत्या रेल्वेत काव्या आहे हे आव्हान होते. त्यावेळी पोलिसांनी पुरेसा होमवर्क करत काव्याची माहिती RPF ( Railway protection force) च्या टिमला दिले. महाराष्ट्र रेल्वे पोलीस आणि रेल्वे विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काव्याची शोध मोहीम सुरू झाली. या तपासामध्ये काव्या तिचा YouTube वर झालेला आणि लखनऊमध्ये राहाणाऱ्या मित्राकडे जात असल्याची माहिती समजली, काव्या खुशीनगर एक्स्प्रेसनं प्रवास करत होती. तसंच तिच्या रेल्वेनं मध्य प्रदेशातील खांडवा शहर ओलांडले असल्याचीही पोलिसांना कळाले होते. या सर्व माहितीच्या आधारे RPF च्या टिमनं काव्याला ताब्यात घेतले.