ChikhaliCrime

रस्त्याने घरी जात असलेल्या इसमाला मारहाण

मेरा बु , ता. चिखली (प्रतिनिधी) –  रस्त्याने घरी जाणाऱ्या इसमाला अडवून धमकी देत म्हटले तू कमलाकर पडघान यांच्या शेतात का जातो असे म्हणून मारहाण केली . मारहाणी मध्ये सदर इसमाला गंभिर जखमी केले अशा तक्रारी वरुण अंढेरा पोलिसांनी मेरा बु येथील पुरुषोत्तम पडघान यांच्या विरुद्ध विविध गुन्हे दाखल केले आहे .

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा बु येथील रहिवाशी असलेले रवि रमेश पडघान वय ३० वर्ष यांनी दिलेल्या तक्रारी मध्ये म्हटले की घरी जात असताना गावातील पुरुषोत्तम रामदास पडघान हा रस्त्यात भेटला आणि म्हणाला की तु कमलाकर पाटील यांचे शेतात कशाला कामाला जातो असे म्हणून त्याने शिविगाळ करुण चापटा बुक्यांनी मारहाण केली व डोक्यावर पाठीवर काठीने मारहाण केली व तु जर यापुढे कमलाकर पाटील यांच्या शेतात गेला तर तुला जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली.  जास्त मार असल्याने चिखली येथे उपचार केला दवाखान्याचे मेडिकल रिपोर्ट वरुण अंढेरा ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शना खाली पोहेकॉ विलास काकड यांनी आरोपी पुरुषोत्तम रामदास पडघान यांच्या विरुद्ध अप नं ०२५९/२२ कलम ३२४, ३२५,५०४,५०६ प्रमाणे गुन्हे दाखल करीन तपास बिट अंमलदार सिरसाट यांच्याकडे दिला आहे .


बीट अमलदाराने जाणूनबुजून तक्रार दाखल केली, पाेलिस अधीक्षकांकडे तक्रार

पुरुषोत्तम रामदास पडघान यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक बुलढाणा यांना दिलेल्या तक्रारी मध्ये म्हटले आहे की, घराच्या पाठीमागे रात्रीला चार ते पाच महिला व काळजी पुरुष मंडळीमध्ये हरिपाठ सुरू होता . रात्रीचे १२ ते १ वाजेच्या दरम्यान रवी रमेश पडघान हा दारूच्या नशेत अंगावर कपडे नसून, फक्त निकर घालून आला आणि दरवाजा उघडून घरात आला,  घरात भाडे पडल्याने आम्हाला जाग आली, आणि कोण आहे असे म्हणत, चोर समजून महिलांनी त्याला मारहाण केली. मात्र तो महिलांच्या तावडीतुन निघून गेला, अशी तोंडी माहिती पो स्टे अमलदार सिरसाट यांना दिली होती. परंतू बिट अमलदार सिरसाट यांनी जाणूनबुजून त्रास देण्याच्या उद्देशाने उलट माझ्यावरच गुन्हे दाखल केले . त्यामुळे बिट अमलदार यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे, असे  ब्रेकिंग महाराष्ट्रशी बाेलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!