Mumbai

प्रभादेवीत भाजपाची “अशी ही फोडाफोडी”!

सध्या राज्याच्या राजकारणामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. एकमेकांचे पक्ष फोडताना नवी समीकरणे तयार करताना राजकीय पक्ष दिसतात. मात्र मुंबईत पारंपारिक उत्सव जतन करण्यासाठी ही भाजपाच्यावतीने प्रभादेवी परिसरात अनोख्या फोडाफोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) : मुंबई ही देशाची जशी आर्थिक राजधानी आहे तशीच ती महाराष्ट्राची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी सुद्धा आहे.  मुंबई विशेषता मध्य मुंबईमध्ये सण उत्सव आणि प्रथा परंपरा अगदी प्राणपणाने आणि आनंदाने जोपासल्या जातात. येथील रहिवाशी प्रत्येक सण आणि उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसतात.  म्हणूनच या परिसरात दिवाळी गणेशोत्सव दसरा नारळी पौर्णिमा आणि दहीहंडी अतिशय जोरदारपणे साजरी होताना दिसते.  नागरिकांचा या उत्सवी वृत्तीला जतन करण्यासाठी आणि प्रथा परंपरा जोपासण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने मुंबई सचिव सचिन शिंदे यांनी नारळ फोडण्याचा स्पर्धेचे आयोजन केले होते. नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेत परिसरातील शेकडो स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

स्पर्धेच्या अंतिम विजेत्याला चांदीचा नारळ

या ठिकाणी आलेल्या शेकडो स्पर्धकांनी अत्यंत उत्साहात आणि आनंदाने नारळ फोडण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. जास्तीत जास्त नारळ फोडणाऱ्या स्पर्धकांना विविध पारितोषिके देण्यात आली. प्रभादेवी परिसरात विविध दहा ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे उत्साही वातावरण तयार झाले होते कोरोना नंतर पहिल्यांदाच नारळी पौर्णिमा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी होताना दिसत होती. या स्पर्धेतील अंतिम विजेत्याला भाजपाच्या वतीने चांदीचा नारळ हे पारितोषिक देण्यात आले.

परस्परातील स्नेहभाव वाढवणारा उत्सव

नारळी पौर्णिमेनिमित्त आपल्या परंपरा जोपासल्या जाव्यात यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच या स्पर्धेच्या खेळामुळे स्पर्धकांमधील परस्पर स्नेहभाव आणि खेळाडू वृत्ती जोपासली जाते एक सांघिक आणि सणाचे पावित्र्य राखणारे नाते निर्माण होते हाच या स्पर्धेच्या आयोजना मागचा हेतू होता असे सचिन शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!