धुळे (ब्युराे चीफ) – सर्वच राजकारण्यांनी राजकारण बाजूला ठेवून आपण समाजाचे काही देणे लागतो, ही भावना मनात ठेवून काम केलं तर भारत देश सुजलाम सुफलाम होईल. देशात महागाईने उच्चांक गाठला असताना ‘हर घर तिरंगा’ संकल्पनेसह हर घर शिक्षा ‘हर घर रोजगार’ हा संकल्प केला असता, तर नागरिकांमध्ये तुमच्या बाबत अजून विश्वास वाढला असता, असे सांगत राष्ट्रवादी अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांनी विरोधकांना इशारा दिला. देशाच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळेच्यावतीने भाजपाच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला आव्हान दिले.
स्वतंत्र देशाचा अमृतमहोत्सव सर्वत्र उत्सहापूर्वक वातावरणात साजरा होत असताना राजकारण बाजूला ठेवत, धुळे शहर राष्टरवादी काँग्रेस पक्षाने अभिनव उपक्रम शहरवासीयांचे मन जिंकल्याचे चौका चौकात बोलले जात आहे. देशाच्या स्वतंत्र लढ्यात सर्वच नागरिकांचे योगदान आहे, पण जाणून बुजून वातावरण गढूळ करणाऱ्या पक्ष्यांना अशा उपक्रमांनी चपराक बसेल, असेदेखील जहागीरदार यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. १०० फुटी रस्त्यावरील सोमय्या हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांच्याहस्ते शालेय साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले.