धुळे (ब्युरो चीफ) – देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयावरदेखील तिरंगा ध्वज फडविला जावा, अशी मागणी करत, धुळे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने धुळ्याच्या जिल्हाधिकार्यांना तिरंगा ध्वजासह निवेदन देण्यात आले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपावेतो प्रत्येक भारतीय नागरिक स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत असतो. मात्र आजपावेतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकविला गेला नसल्याचे सांगत, धुळे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनासह, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत, आरएसएसच्या मुख्य कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी तिरंगा भेट देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
जिल्हाधिकार्यांच्या बंगल्यात घुसून चंदनाच्या झाडाची चोरी
धुळे – जिल्हाधिकारी बंगल्यात घुसून आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी करण्याची हिम्मत चोरट्यांची झाली असून, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जिल्हाधिकारी निवासस्थान आवारात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी कडेकोट सुरक्षा भेदून, सीसीटीव्ही कॅमेर्याची नजर चुकवून, थेट जिल्हाधिकारी यांनाच आव्हान दिल्याने, सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागालादेखील सतर्क होत, या अज्ञात पुष्पाला जेरबंद करण्यासाठी आपली कसोटी पणाला लावावी लागणार, हे मात्र खरे!
Leave a Reply