Buldana

विवेकानंद आश्रम परिसर माणूस घडविणारा : तहसीलदार डॉ. संजय गरकल

हिवरा आश्रम, ता. मेहकर (प्रतिनिधी) – शिक्षण माणसाला शहाणपण देते, सुज्ञपणा देते, लोकशाही मूल्यांची व विधायक कार्यासाठी लागणारी वर्तनक्षमता शिक्षणाने प्राप्त होते.  शैक्षणिक दृष्टया अत्यंत सुयोग्य असलेला हा परिसर आहे. या ठिकाणी शिक्षणासोबत इतर मूल्यांची बांधलकी जोपासत सुजान नागरीक तयार होतो. कारण विवेकानंद आश्रमाचा परिसर हा माणूस घडविणारा आहे, असे विचार मेहकरचे तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (ता.८) रोजी पदवी वितरण बोलतांना व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. डी. पाटील होते.  पदवीनंतर उच्चशिक्षण घेवून विविध क्षेत्रात करिअर करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिश्रमाची कास धरावी.  सेवाक्षेत्रात काम केल्याने देशाची सेवा घडते. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे.  या अमृतमहोत्सव वर्षात प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावा असे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.  अमरावती विद्यापीठाच्या संग्लनीत असलेले हे महाविद्यालय गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणासाठी सर्वदूर परिचीत आहे.  शिक्षणासोबतच स्वावलंबन, संस्कार या गुणांची पायाभरणी महाविद्यालयीन जीवनातच होत असल्याने विद्यार्थी जीवनात यशस्वी होत आहेत.  यावर्षीच्या गुणवत्ता यादीत मुलींची संख्या जास्त असल्याचे समाधान आहे, असे विचार प्राचार्य डॉ.पाटील यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजन व पाहूण्यांच्या स्वागतांने झाली.  या कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध विषयांच्या १०९ विद्यार्थ्यांना पदवी वितरण कारण्यात आली.  शाम शेळके व प्रतिक्षा गवई या पदवीप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जा व प्रात्यक्षिक परिक्षांचा सराव अत्यंत उपयुक्त ठरला असून भविष्यात पदव्युत्तर पदवीसाठी त्यांचा उपयोग होणार आहे.  स्पर्धा परिक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शनाचा लाभही या महाविद्यालयातून झाला असून प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची इच्छा पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.  यावेळी व्यासपीठावर विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.डी.पाटील, प्रा.जयप्रकाश सोळंकी तथा सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन गायकवाड तर सुत्रसंचालन वैष्णवी बोरकर, अनुजा चंद्रवंशी तर आभारप्रदर्शन इश्वरी आमले हीने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!