हिवरा आश्रम,ता. मेहकर (प्रतिनिधी) – यावर्षी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आहे. हे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनामार्फत देशभरात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून निष्काम कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी गावातून देशभक्तीचे नारे देत गावातून प्रभात फेरी काढली. तसेच हर घर तिरंगा अभियानाला बळकटी देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी निर्माण करून एकता व अखंडता दर्शन घडविले.
यावेळी मेहकर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी मधुकर वानखेडे, गट सन्वयक प्रमोद रायमूलकर, केंद्रप्रमुख संजय दुणूग यांच्या मार्गदर्शनाखाली तथा माळखेड येथील विषय शिक्षक अनंत शेळके यांच्या कल्पकतेतून विवेकानंद विद्या मंदिरात हर घर तिरंगा मानवी साखळी निर्मिती मूर्त रूप मिळाले. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनाचे स्मरण व्हावे व देशाच्या दैदिप्यमान इतिहास नागरीकांच्या मनात तेवत राहावा या उदेशाने केंद्र शासना मार्फत संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. विवेकानंद विद्या मंदिरात हर घर तिरंगा मानवी साखळी निर्माण करून विद्यार्थ्यांनी हे अभियान यशस्वीपणे राबविले. यावेळी विवेकानंद विद्या मंदिराचे प्राचार्य आर.डी. पवार,पर्यवेक्षक केलवानंद टवलारे,संजय भारती, विश्वस्त अशोक गिऱ्हे,शिवदास सांबपूर,क्रिडा शिक्षक रणजित जाधव,गोविंद अवचार,श्याम खरात,अनिल देशमुख,.डिगांबर मिसाळ,विजय गोसावी,राजेश रत्नपारखी तथा विवेकानंद विद्या मंदिरातील सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.