– टाटा नेक्सॉन चौथ्या क्रमांकावर
नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – जुलै महिन्यांत चांगली कार विक्री झाली असून, पहिल्या १०मध्ये मारूती-सुझुकीच्या गाड्यांनी बाजी मारली आहे. मागील महिन्यात मारूतीच्या एक लाख ४२ हजार ८५० गाड्यांची विक्री झाली तर दोन नंबरवर हुंदाईच्या गाड्या राहिल्या आहेत. ५० हजार ५०० इतक्या हुंदाईच्या गाड्या मागील महिन्यात विकल्या गेल्यात. तर टाटा मोटर्सच्या गाड्यांची ४७ हजार ५०६ इतकी विक्री झाली आहे. टाटाचा सेल मागील महिन्यात घसरला असून, विक्रीत बहुचर्चित टाटा नेक्सान चौथ्या क्रमांकावर आहे.
टाटांच्या गाड्यांमध्ये टाटा पंचची चांगली विक्री झाली आहे. जूनमध्ये पंचचा सेल १० हजार ४१४ युनीट इतका होता, तो ५ टक्क्यांनी वाढून ११ हजार ७ इतका झाला आहे. छोट्या गाड्यांत मारूती सुझुकीची एस-प्रेसो ही गाडी चांगली विकल्या जात असून, मागील महिन्यात ११ हजार २६८ गाड्या विकल्या गेल्या आहेत. तर हुंदाईटी व्हेनू १२ हजार इतकी विकल्या गेली आहे. आजही हुंदाई क्रेटा ही सर्वाधिक विक्री होणारी गाडी ठरली असून, मागील हिन्यात ती १२ हजार ६२५ इतकी विकली गेली आहे.
———-
Leave a Reply